वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Thursday, August 11, 2022

हा आठवडा आपल्यासाठी सामान्यतः फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस बदलत्या वातावरणासह आपल्या प्रकृतीत होत असलेला बदल आपणास प्रकर्षाने जाणवेल. ऋतुजन्य समस्येने आपण व्यथित होण्याची संभावना आहे. व्यापारी आपला व्यापार वाढविण्याचा विचार गंभीरपणे करून काही नवीन लोकांची मदत सुद्धा घेऊ शकतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. त्यांना नशिबाची संपूर्ण साथ मिळेल. इच्छित ठिकाणी आपली बदली होण्याची शक्यता आहे. आपली प्रकृती सुद्धा उत्तम राहील. आपण स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिकेवर खुश व्हाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपला वैवाहिक जोडीदार आपल्या बरोबर चांगले वर्तन करेल, परंतु त्याच बरोबर एखाद्या गोष्टीने आपल्यावर रागावण्याची शक्यता सुद्धा आहे. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत. विद्यार्थी अभ्यासात अधिक रुची घेतील.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:14

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:आयुष्यमान

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:22 to 15:59

यमगंड:06:14 to 07:51

गुलिक काळ:09:29 to 11:06