वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Sunday, November 27, 2022

वृषभ राशीच्या जातकांसाठी नोव्हेंबर महिना मध्यम फलदायी आहे. ह्या महिन्यात आपणास दोन गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, पहिली गोष्ट म्हणजे आपले आरोग्य व दुसरी गोष्ट म्हणजे आपले खर्च. ह्या दोन्ही गोष्टी आपणास व्यस्त व चिंतेत ठेवतील. प्रकृतीत चढ - उतार येतील. अधून मधून प्रकृती जरी चांगली झाली तरी समस्यांत वाढ होऊ शकते. त्यामुळे आपणास आरोग्याप्रती जागरूक राहून नियमित व्यायाम व प्राणायाम सदृश्य चांगल्या संवयी लावून घ्याव्या लागतील. आपल्या खर्चात अचानकपणे आपल्या कल्पनेहून अधिक वाढ होण्याची संभावना आहे. त्यामुळे आपण काहीसे चिंतीत व्हाल. परंतु बँकेचे कर्ज मंजूर झाल्याने आपली अनेक कामे पूर्ण होतील व त्यामुळे आपण शांत झोप घेऊ शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आपल्या संबंधात वाढत असलेल्या चिंताना दूर करण्यासाठी आपणास आपला वैवाहिक जोडीदार व त्याचे कुटुंबीय ह्यांच्याशी बोलणी करावी लागतील. हा महिना प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपल्या संबंधात जवळीक वाढेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाचे चांगले फळ मिळेल. हा महिना व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. विद्यार्थ्यांची ह्या महिन्यात चांगली प्रगती होईल. त्यांना स्पर्धेत सुद्धा चांगले यश मिळू शकेल. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:00

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:31 to 17:53

यमगंड:12:26 to 13:48

गुलिक काळ:15:10 to 16:31