वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Monday, November 29, 2021

हा महिना आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपल्या एखाद्या योजनेस गती येऊन त्यात आपणास चांगला आर्थिक लाभ सुद्धा होईल. आपणास एखादे नवीन तंत्र शिकण्याची इच्छा होईल व त्यासाठी आपण एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुद्धा घेऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला असून त्यांना परीक्षेत चांगले परिणाम मिळतील. आपण वाद - विवादात किंवा कोर्ट - कचेरीत यशस्वी व्हाल. एखाद्या सरकारी नोकरीसाठी आपली निवड सुद्धा होऊ शकते. नोकरी करणाऱ्या जातकांना कमी श्रमात अधिक फल मिळण्याची संभावना आहे. आपण विरोधकांवर मात करू शकाल. ह्या महिन्याचे मधले दिवस प्रेमीजनांसाठी अधिक अनुकूल आहेत. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काही गैरसमजामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. ह्या महिन्यात आपल्यात आळस वाढण्याची शक्यता असल्याने नशिबाच्या भरवशावर बसून न राहता स्वतः प्रयत्नशील राहून आळस झटकावा लागेल. आरोग्य काहीसे नाजूकच राहील. आपणास ताप, डोकेदुखी, नेत्र विकार, पोटाची जळजळ किंवा रक्तात उष्णता वाढण्याची समस्या होणे संभवते. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:02

आजची तिथी:कृष्ण पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:प्रीती

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:23 to 09:44

यमगंड:11:06 to 12:27

गुलिक काळ:13:49 to 15:10