वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Thursday, June 30, 2022

हा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण मागील महिन्यात ज्या वस्तूंवर खर्च करत होता ते बंद करून आता आपण काही नवीन वस्तू खरेदी करण्यात पैसे खर्च कराल. ह्याचा अर्थ असा कि खर्चाचे स्वरूप बदललेले असले तरी खर्च हे होणारच आहेत. आपली प्राप्ती सुद्धा चांगली असेल. असे असून सुद्धा आपणास अधिक कार्यक्षम आर्थिक नियोजन करावे लागेल. आपल्या ग्रहमानानुसार ह्या महिन्यात आपण आपल्या दूरदर्शी विचारसरणीचा खूप फायदा घ्याल. आपले संबंध टिकवून ठेवण्यासाठी आपल्या कार्यास योग्य गती द्याल जे आपणास करावयास आवडते. कौटुंबिक जीवनात शांतता नांदेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. ते कष्ट सुद्धा खूप करतील. हा महिना व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या योजना फलद्रुप होतील, तसेच आपली इच्छापूर्ती सुद्धा होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेमाने भरून संबंध दृढ होतील. हा महिना प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपली प्रियव्यक्ती तिच्या भावना आपल्या समक्ष व्यक्त करून आपणास एखादी भेटवस्तू सुद्धा देऊ शकेल. आपल्यात एखादा वाद होण्याची संभावना असल्याने सावध राहावे. आपले आरोग्य चांगले राहणार असले तरी अबर - चबर खाऊन आपण आजारी सुद्धा पडू शकता. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात आनंद प्राप्त होईल. ते सहजपणे अभ्यासात प्रगती करू शकतील. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:57

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: नाग

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:24 to 16:06

यमगंड:05:57 to 07:38

गुलिक काळ:09:20 to 11:01