वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Tuesday, March 21, 2023

हा महिना आपल्यासाठी चांगला आहे. वैवाहिक जीवनातील तणाव निवळू लागेल व जोडीदार सुद्धा आपणास समजून घेईल. आपल्यातील परस्पर समजूतदारपणा वाढेल. संतती इच्छूकांना संतती प्राप्तीची शक्यता आहे. प्रेमीजनांच्या नात्यात रोमांस व समजूतदारपणा दोन्ही असल्याने आपले नाते अधिक दृढ होईल. ह्या महिन्यात आपले नेतृत्व कौशल्य दिसून येईल. आपण आपल्या संघाला चांगल्या प्रकारे हाताळू शकाल व त्यामुळे सांघिक कामगिरी उत्तम होईल. असे झाल्याने नोकरीतील आपले स्थान मजबूत होईल. तसेच आपली पगारवाढ होण्याची शक्यता आहे. आपली पदोन्नती सुद्धा संभवते. ह्या सर्वांमुळे आपण खुश व्हाल. असे असले तरी आपला अहंकार आपणास बाजूस ठेवावा लागेल, अन्यथा एखाद्यास काही बोलल्याने नोकरीवर नकारात्मक परिणाम होऊन त्रास होण्याची संभावना आहे. व्यापारी आपल्या बुद्धिमत्तेचा लाभ घेऊ शकतील. त्यांना नशिबाची साथ मिळाल्याने व्यापारात यश प्राप्त होईल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील, त्यांच्या ज्ञानात भर पडेल. ह्या महिन्यात आपल्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाल्याने आपणास दिलासा मिळेल. महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:43

आजची तिथी:अमावस्या

आजचे नक्षत्र:पूर्वाभाद्रपदा

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:अमावस्या

आजचा योग:शुभ

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:48 to 17:19

यमगंड:11:16 to 12:47

गुलिक काळ:12:47 to 14:17