वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Saturday, January 28, 2023

२०२३ चा हा पहिला महिना आपणास अनुकूल तर असेलच, परंतु आपला क्रोध वाढेल व त्यामुळे आपणास त्रास होण्याची शक्यता आहे. क्रोधीत स्वभावामुळे आपल्या कौटुंबिक जीवनात सुद्धा काही त्रास जाणवेल. तेव्हा डोके शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. हा महिना प्रेमीजनांसाठी खूपच अनुकूल आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीस विवाहाची मागणी घातल्यास ती व्यक्ती आपणास होकार देऊन आपला प्रेम विवाह सुद्धा होऊ शकतो. ह्या महिन्यात आपल्या प्राप्तीत सुद्धा मोठी वाढ होत असल्याचे दिसून येईल. कदाचित आपण नोकरी करत असताना एखादे नवीन काम सुद्धा सुरु कराल. असे झाल्यास आपणास चांगली प्राप्ती होऊ लागेल. असे असले तरी आपला क्रोध उफाळून आल्याने आपणास अनेकदा त्रास सहन करावा लागू शकतो. आपण जर एखादा व्यापार करत असाल तर त्यात उन्नती तर होईलच परंतु आपला क्रोधीत स्वभाव आपले नुकसान सुद्धा करू शकेल. तेव्हा सावध राहावे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना अनुकूल आहे. आपणास नशिबाची साथ मिळेल. आपली पदोन्नती होऊ शकते किंवा आपण नोकरी बदलण्यात यशस्वी होऊ शकता. हा महिना विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगला आहे. त्यांचे अभ्यासात लक्ष लागेल व त्याचे त्यांना चांगले परिणाम मिळतील. सध्या आपणास प्रकृतीच्या बाबतीत काहीसा अशक्तपणा जाणवेल. ताप किंवा प्रचंड अंगदुखी किंवा नेत्र विकार होण्याची संभावना आहे. प्रवासासाठी सुरवातीचे काही दिवस वगळता पहिला व तिसरा आठवडा अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:साध्य​

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43