वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Thursday, January 27, 2022

हा महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. वर्षाचा हा पहिला महिना आपल्यासाठी काही आशा घेऊन येणारा आहे. व्यापारासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आपल्या चपळतेच्या व बुद्धिकौशल्याच्या जोरावर अनेक नवीन कामांना समजून घेऊन प्रगती करण्याची संधी आपणास मिळेल. हा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. आपणास नशिबाची साथ मिळाल्याने कामात यश प्राप्त होईल, तसेच नवीन काही करण्यासाठी नोकरीत बदल करण्याचा विचार सुद्धा आपण कराल. आपल्यापैकी काही लोकांना इच्छित ठिकाणी बदली सुद्धा मिळू शकेल. आपल्या ज्ञानाचा आपणास फायदा होईल. कुशाग्र बुद्धिमत्तेचा लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. ह्या महिन्यात विवाहितांचे वैवाहिक जीवन काहीसे तणावग्रस्त राहण्याची संभावना आहे. वैवाहिक जोडीदाराच्या क्रोधीत वृत्तीमुळे आपण व्यथित होण्याची संभावना आहे. त्यांच्याशी प्रेमाने बोलणे आपल्या हिताचे होईल. प्रेमीजनांसाठी हा महिना खूपच चांगला असून आपल्या प्रियव्यक्तीसह आपण फिरावयास जाऊ शकाल. प्राप्ती सामान्यच राहिली तरी खर्च सुद्धा सामान्यच राहणार असल्याने काळजी करावी लागणार नाही. विना कारण प्रवास करणे टाळावे. प्रवास करण्याची गरज असलीच तर महिन्याचा दुसरा आठवडा त्यासाठी अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29