वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Wednesday, June 7, 2023

हा महिना आपल्यासाठी चांगला आहे. आपणास आपली भावंडे व मित्रांसह मौजमजा करण्याची व फिरावयास जाण्याची संधी मिळेल. त्याने आपले मन हलके होऊन आपल्या मनात आनंदाची भावना राहील. कौटुंबिक जीवनात सुद्धा सुख - समाधान लाभेल. वैवाहिक जीवनात मात्र समस्याने घेरले जाल. त्यास आपला व्यवहार कारणीभूत ठरेल, तेव्हा स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर भर द्यावा. प्रेमीजनांना हा महिना सुखावह होणार आहे. एकमेकांशी बराच वेळ फोनवर बोलण्याने आपल्या मनाच्या सर्व समस्या दूर होतील. आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करू शकाल. ह्यामुळे आपल्या खर्चात वाढ होऊन आपली काळजी वाढण्याची संभावना आहे. तेव्हा आपण खर्चांवर नियंत्रण ठेवावे. आपली प्राप्ती सामान्यच राहील. ह्या महिन्यात नोकरी करणाऱ्या व्यक्ती खूप मेहनत करून आपली कामे पूर्ण करतील, तेव्हा कोठे त्यांना चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांना भरपूर मेहनत करूनच यशस्वी होता येईल. त्यांना व्यापार वृद्धीसाठी काही लहान - सहान प्रवास सुद्धा करावे लागतील. आपण जर इलेक्ट्रॉनिक, इलेकट्रीकल व उपकरणांशी संबंधित व्यापार करत असाल तर आपला व्यापार शीघ्र गतीने प्रगती करेल. कपड्यांशी संबंधित व्यापार करणाऱ्यांना सुद्धा यश प्राप्त होईल. विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी झाल्याने त्यांना अध्ययनात काही अडथळे येतील. ह्या महिन्यात आपल्या प्रकृतीत चढ - उतार होत असल्याचे दिसून येईल. आपण आजारी पडण्याची शक्यता आहे. तेव्हा काळजी घ्यावी. महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:ब्रह्म​

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:38 to 14:19

यमगंड:07:34 to 09:15

गुलिक काळ:14:19 to 16:00