वृषभ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

वार्षिक मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)

Monday, October 18, 2021

२०२१ ह्या वर्षी वृषभ राशीच्या जातकांना आयुष्यात स्थिर होण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील. जर आपणास संधीचा लाभ घेता आला तर २०२१ ह्या वर्षी आपण खूपच मोठी प्रगती करू शकाल. आपल्या लग्नी असलेला राहू आपणास काही बाबतीत निरंकुश करेल कि ज्यामुळे आपण यशप्राप्तीसाठी अविरत परिश्रम करण्यास तयार व्हाल. सुख उपभोगण्याची आपली इच्छा असल्याने त्यासाठी आपण प्रयत्नशील सुद्धा राहाल. आपल्या पाठीशी कुटुंबातील वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद असल्याने आपण कार्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने २०२१ चे वर्ष सामान्य फळ देणारेच राहील. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे, २०२१ ह्या वर्षात वैवाहिक जीवनाचे सौख्य हे सरासरीच असणार आहे. कुटुंबात आपली स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. २०२१ दरम्यान आपण दूरवरचे प्रवास कराल ज्यातील काही प्रवास हे तीर्थयात्रेसाठी असतील, म्हणजे ह्या वर्षात तीर्थयात्रांची संख्या इतर प्रवासांहून अधिक असेल. ह्या तीर्थयात्रांमुळे आपणास जीवनातील नवीन ऊर्जा प्राप्त होऊन आपल्या आत्मविश्वासात वाढ होईल. काही जातकांची परदेशवारीची इच्छा पूर्ण होऊ शकेल. तसेच काही जातकांना आपल्या कर्माची फळे सुद्धा भोगावी लागतील. आपण जर कायद्या विरुद्ध काही कार्य केले असेल तर २०२१ च्या सुरवातीलाच शासनाकडून शिक्षा होऊ शकते, त्यामुळे आपणास काळजी घ्यावी लागेल. शैक्षणिक क्षेत्रात आपल्या एखाद्या शिक्षकांची किंवा प्राध्यापकांची कृपा दृष्टी होऊन आपणास मोठे यश प्राप्त होईल. ते आपले तारणहार ठरतील. आपला वैवाहिक जोडीदार जर नोकरी करत असेल तर २०२१ दरम्यान त्यांना परदेशात जाण्याची संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:37

आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:पूर्वाभाद्रपदा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:04 to 09:31

यमगंड:10:57 to 12:24

गुलिक काळ:13:51 to 15:18