वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Thursday, February 2, 2023

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील व एकमेकांसह चांगल्या स्थितीत राहतील. प्रेमीजनांसाठी आठवडा फायदेशीर आहे. आपण एकमेकांच्या सहवासात वेळ घालवाल. फिरावयास व खरेदी करण्यास सुद्धा जाऊ शकाल. कुटुंबियांशी आपल्या प्रिय व्यक्तीची ओळख करून देऊ शकाल. घरात लग्नाच्या गोष्टी सुद्धा होऊ शकतील. आठवड्याच्या सुरवातीस आपले खर्च वाढल्याने व प्राप्ती सामान्यच राहिल्याने आपण आर्थिक दृष्ट्या काहीसे त्रासल्याचे दिसून येईल. मानसिक तणावास आपल्यावर ताबा मिळू देऊ नका, अन्यथा आपली विचारशक्ती प्रभावित होईल. असे असले तरी नोकरीत आपली स्थिती अनुकूल होईल. आपले सहकारी सुद्धा आपल्या कामगिरीची प्रशंसा करत असल्याचे दिसून येईल. विरोधकां पासून सावध राहा. अर्थात काही काळा पुरताच आपणास त्यांचा त्रास होईल. ह्या दरम्यान मानसिक तणाव वाढणार नाही याची काळजी घ्यावी. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. विद्यार्थी खूप मेहनत करताना दिसतील. त्यांना त्याचे सकारात्मक परिणाम सुद्धा मिळतील. आरोग्याच्या बाबतीत सध्या आपणास जागरूक राहण्याची गरज आहे. मानसिक तणावामुळे सुद्धा त्रास संभवतो. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:19

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:आर्द्रा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वैध्रुति

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:16 to 15:40

यमगंड:07:19 to 08:42

गुलिक काळ:10:06 to 11:29