वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Saturday, August 20, 2022

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. कौटुंबिक जवाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी वेळ द्याल. कुटुंबास आपली गरज भासेल. आपण ती गरज पूर्ण कराल व त्यामुळे कुटुंबियांच्या नजरेत आपली सुद्धा किंमत वाढेल व आपणास सुद्धा आनंद प्राप्त होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात थोडे चढ - उतार येतील. आपला वैवाहिक जोडीदार काही कारणाने रागावण्याची संभावना आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. त्यांचे प्रणयी जीवन सुखद होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांना चांगले परिणाम मिळवून देणारा आहे. त्यांना कामा निमित्त प्रवास करावे लागतील व ते आपल्यासाठी उपयुक्त ठरतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपली बदली संभवते. हि बदली आपल्या हितासाठीच असल्याने तीचे स्वागत करावे. आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात सुखद परिणाम मिळतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:17

आजची तिथी:कृष्ण पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:व्याघात

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:30 to 11:06

यमगंड:14:19 to 15:55

गुलिक काळ:06:17 to 07:53