वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Saturday, January 28, 2023

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या मित्रांसह खूप मौजमजा करत असल्याचे दिसून येईल. एखादा लहान - सहान प्रवास सुद्धा करू शकाल. कौटुंबिक वातावरण सकारात्मक असेल. भावंडांशी सामंजस्य राहील. कौटुंबिक जीवनात माता - पित्यांचा आशीर्वाद व सहकार्य मिळाल्याने अनेक कामे सहजपणे होऊ लागतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. नात्यात सलोखा निर्माण झाल्याने आपण एकमेकांच्या सहवासात वेळ घालविण्याची कोणतीही संधी वाया घालवणार नाही. काहीशा तणावाच्या वातावरणात विवाहितांचे वैवाहिक जीवन मार्गक्रमण करेल. आपण समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न कराल. आपल्यात आपुलकी असल्याचे दिसून येईल. व्यापारास गती येईल. काही फायदेशीर सौदे आपल्या नजरेस येतील, ज्यात गुंतवणूक करून आपण प्रगती करू शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा सामान्यच राहील. आपले प्रयत्न यशस्वी होतील. कार्यात यश प्राप्त झाल्याने मन आनंदित होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. मेहनत केल्यास स्पर्धेत सुद्धा यशस्वी होता येईल. ह्या आठवड्यात आपल्या आरोग्यात सुधारणा होईल. असे असले तरी घसा किंवा खांदा यांच्याशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:साध्य​

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43