वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Thursday, January 27, 2022

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस प्राप्तीत वाढ होईल. आठवड्याच्या मध्यास प्राप्ती कमी व खर्च जास्त होतील. आठवड्याच्या अखेरीस सर्वकाही सुरळीत होईल. आपण मानसिक दृष्ट्या समृद्ध व्हाल. आपणास परिस्थितीचा अंदाज आल्याने त्याचा फायदा होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कौशल्याचा फायदा होईल. व्यापारी आपल्या व्यापारास पुढे नेण्यासाठी नवीन योजना अंमलात आणू शकतील. ह्या आठवड्यात विवाहितांच्या वैवाहिक जीवनात नवीन गोडवा निर्माण होऊन त्यांच्या प्रेमाचे गोडवे गायले जातील. प्रेमीजन ह्या आठवड्यात खूप आनंद करू शकतील. त्यांच्या प्रिय व्यक्ती विषयी बऱ्याच गोष्टी ऐकून ते आनंदित होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणींना सामोरे जावे लागेल. अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी त्यांना खूप परिश्रम करावे लागतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29