वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Sunday, November 27, 2022

नोव्हेंबर महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. ह्या महिन्यात खर्चात खूप वाढ झाल्याने आपल्या आर्थिक स्थितीवर भार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपणास आपल्या योजना आखताना ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीची बिघडलेली प्रकृती आपणास चिंतीत करू शकेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात चांगले परिणाम मिळतील. आपण खूप मेहनत कराल. आपणास कामा निमित्त खूप प्रवास करावा लागेल. आपणास परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते. हा महिना व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपण आपल्या कामा निमित्त अनेक लोकांना भेटू शकाल व त्यामुळे आपले कार्य पुढे नेण्यास आपण यशस्वी होऊ शकाल. मित्रांशी वाद होऊ शकतो, परंतु त्यांची समजूत घालण्याचा आपण प्रयत्न करावा. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. आपणास स्वतःवर लक्ष केंद्रित करावे लागेल व वागणुकीत सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न सुद्धा करावा लागेल. प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. विद्यार्थ्यांना अध्ययनात चांगले परिणाम मिळतील. ह्या महिन्याचे सुरवातीचे दिवस व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:00

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:31 to 17:53

यमगंड:12:26 to 13:48

गुलिक काळ:15:10 to 16:31