वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Saturday, August 20, 2022

हा महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी असून खूपच सावध राहण्याचा आहे. षष्ठात राहू असल्याने आपले आरोग्य बिघडून आपण आजारी पडण्याची संभावना असल्याने आपणास स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागेल. हा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर कामातील स्वतःच्या लहान - सहान चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपण कराल. त्यामुळे आपली कामगिरी चांगली होईल. हा महिना व्यापाऱ्यांसाठी काहीसा प्रतिकूल आहे. ह्या महिन्यात आर्थिक गुंतवणूक करणे आपल्यासाठी जोखमीचे होऊ शकेल. तेव्हा कोणतीही मोठी गुंतवणूक करू नये. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. त्यांचे मन अभ्यासात व्यस्त राहील व त्यामुळे ते यशस्वी होतील. आपणास स्पर्धेत सुद्धा यश मिळू शकेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चढ - उतार येतील. आपणास सासुरवाडीकडील लोकांना भेटण्याची संधी मिळेल. प्रेमीजनांना त्यांच्या प्रणयी जीवनात आनंद उपभोगता येईल. ह्या महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:17

आजची तिथी:कृष्ण पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:व्याघात

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:30 to 11:06

यमगंड:14:19 to 15:55

गुलिक काळ:06:17 to 07:53