वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Saturday, January 28, 2023

हा महिना आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनातील वाढत्या तणावाने त्रासून जात असल्याचे दिसून येईल. आपल्या परस्पर संबंधात बिघाड झाल्याचा परिणाम कौटुंबिक जीवनावर होण्याची संभावना आहे. तेव्हा संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा. ज्या व्यक्ती प्रणयी जीवन जगत आहेत त्यांच्यासाठी हा महिना अनुकूल आहे. आपण आपले म्हणणे आपल्या प्रियव्यक्तीस पटवून देण्यात यशस्वी व्हाल व त्यामुळे आपल्या संबंधात माधुर्य निर्माण होईल. महिन्याच्या सुरवातीस मानसिक दृष्ट्या आपण चिंतातुर असल्याचे दिसून येईल. ह्यातून बाहेर पडण्यास आपणास थोडा वेळ लागेल. असे असले तरी विरोधकांना आपण पुरून उराल. आपण त्यांच्यावर मात करू शकाल. हा महिना व्यापारासाठी अनुकूल आहे. आपणास डोके शांत ठेवून काम करावे लागेल, तरच यश प्राप्ती होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना खूपच उपयुक्त ठरेल. सरकारी विभागा कडून एखादा मोठा लाभ पदरी पडू शकतो. आपली पगारवाढ सुद्धा संभवते. त्यामुळे कौटुंबिक जीवनात आनंद पसरेल व आर्थिक दृष्ट्या उन्नती होईल. हा महिना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अनुकूल आहे. अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. असे झाल्याने त्यांना अधिक अभ्यास करण्याची इच्छा होईल. ह्या महिन्यात आपणास आपल्या आरोग्यावर लक्ष द्यावे लागेल. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:साध्य​

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43