वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Monday, September 26, 2022

हा महिना आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आरोग्याशी संबंधीत ज्या समस्या होत्या त्या आता संपुष्टात येऊन आपली प्रकृती ठणठणीत होईल. व्यापारी पुढाकार घेऊन व्यवसायात वेगाने काम करतील, व त्यामुळे त्यांना सुखद परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्यांना काम करण्याचा आनंद घेता येईल, परंतु कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी आपली जवळीक निर्माण होण्याची संभावना आहे. परंतु त्याने आपलेच नुकसान होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे. खर्चात अचानकपणे वाढ होईल. आपल्या प्राप्तीत सुद्धा हळू हळू वाढ होईल. ग्रहस्थितीनुसार आपण एकाच वेळेस अनेक कामात व्यस्त राहाल. त्यामुळे आपणास कामाचे प्राधान्य नक्की करावे लागेल. अन्यथा हि सर्व कामे खोळंबण्याची संभावना आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावग्रस्त असण्याची संभावना असल्याने काळजी घ्यावी. प्रेमीजन एकमेकांशी खूप संवाद साधून स्वतःच्या प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना वरदायी आहे. त्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आपणास स्पर्धेत सुद्धा यश मिळेल. आपण जे काही वाचाल ते सहजपणे आपल्या लक्षात राहील. त्यामुळे अभ्यासात चांगले परिणाम आपणास मिळतील. ह्या महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:59 to 09:30

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:14:01 to 15:31