वृश्चिक   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

वार्षिक मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)

Tuesday, March 21, 2023

२०२३ चे वर्ष आपल्यासाठी बहुतांशी अनुकूलता घेऊन येणारा आहे. आपला आत्मविश्वास उंचावून ह्या वर्षी नवीन काहीतरी करण्याची इच्छा मनात निर्माण होईल. ह्या वर्षात आपणास २ गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे रागावर नियंत्रण ठेवणे, अन्यथा महत्वाच्या कामात खोळंबा होऊ शकतो. दुसरे म्हणजे आपल्या मनातील भावना लोकां समोर जास्त प्रमाणात व्यक्त न करणे, अन्यथा ते आपल्या भावनांचा गैरफायदा घेण्याची संभावना आहे. ह्या वर्षी आपले विरोधक काही प्रमाणात आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, व त्यामुळे आपण मानसिक तणावात राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी ते आपल्या विरुद्ध काही करू शकणार नाहीत व अंतिम विजय आपलाच असल्याने आपणास घाबरण्याची आवश्यकता नाही. कोर्ट - कचेरीशी संबंधित कार्यात आपणास यश प्राप्त होईल. आपणास नोकरीत चांगली स्थिती प्राप्त होईल. आपल्या आर्थिक स्थितीवर ताण येऊ नये म्हणून आपणास वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. ह्या वर्षी प्रकृतीत चढ - उतार येतील. अनेकदा घरगुती उपचाराने सुद्धा आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. अचानकपणे एखादी शारीरिक व्याधी निर्माण होईल, तसेच ती दूर सुद्धा होईल. त्यामुळे आपण काहीसे त्रासून जाल. असे असले तरी आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष न करता आहारावर लक्ष द्यावे. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींच्या आशीर्वादाने आपली प्रलंबित कामे होतील. त्यामुळे आर्थिक लाभासह समाजात सुद्धा आपली प्रतिष्ठा उंचावेल. भविष्यात आपल्यासाठी उपयुक्त ठरतील असे दूरवरचे प्रवास सुद्धा ह्या वर्षी आपण कराल. ह्या वर्षी एखादा विदेश प्रवास सुद्धा संभवतो. जमीन - जुमल्याशी संबंधित कामात आपणास यश प्राप्त होईल. आपण आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर खूप काही करू शकाल. असे असले तरी महत्वाच्या कामात आपला खोळंबा होण्याची संभावना असल्याने सध्या आपणास आळस झटकावा लागेल. आपले मन धार्मिक प्रवृत्तीत गुंतल्याने आपणास मानसिक शांतता जाणवेल. घरात एखादे शुभ कार्य झाल्याने कौटुंबिक वातावरण धार्मिक व शांततेने युक्त राहील. आपल्या मनात नवीन काही शिकण्याची इच्छा जागृत होऊन नवीन विषय शिकण्याचा विचार आपण करण्याची शक्यता आहे. त्याने आपणास निव्वळ आनंदच मिळेल असे नव्हे तर आपले ज्ञान सुद्धा विकसित होईल. काही नवीन व त्यांच्या क्षेत्रात प्रतिष्ठित असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आपण याल. अशा व्यक्तींच्या भेटीने आपण आनंदित व्हाल व आपणास जीवनात प्रगती करण्याची संधी सुद्धा प्राप्त होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:43

आजची तिथी:अमावस्या

आजचे नक्षत्र:पूर्वाभाद्रपदा

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:अमावस्या

आजचा योग:शुभ

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:48 to 17:19

यमगंड:11:16 to 12:47

गुलिक काळ:12:47 to 14:17