धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Saturday, December 3, 2022

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण जर स्वतःवर विश्वास ठेवलात तरच आव्हानांना सामोरे जाऊ शकाल. आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवून आपली आर्थिक बाजू सुदृढ करावी. हा आठवडा आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी चांगला आहे. हि गुंतवणूक दीर्घ कालावधी नंतर आपणास लाभदायी ठरेल. कुटुंबात समाधानाचे वातावरण राहील. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपले संबंध अधिक दृढ होतील. आपण आपल्या प्रणयी जीवनाचा आनंद घेऊ शकाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी खूप कष्ट करणे हा मूलमंत्र राहून आपली मेहनतच आपणास लाभ मिळवून देऊ शकेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चढ - उताराने भरलेला आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा सामान्य आहे. आपली कुशाग्र बुद्धिमत्ता आपल्या उपयोगी येईल. आपल्या ज्ञानात वाढ होईल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:04

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:उत्तराभाद्रपदा

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धी

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:46 to 11:07

यमगंड:13:50 to 15:11

गुलिक काळ:07:04 to 08:25