धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Wednesday, October 5, 2022

हा आठवडा आपणास खूपच यश प्राप्त करून देणारा आहे. आपण मानसिक दृष्ट्या अत्यंत मजबूत व्हाल. आनंदित राहिल्याने आपल्या आत्मविश्वासात सुद्धा वाढ होईल. नोकरीत चांगली कामगिरी झाल्याने बढती मिळण्याची संभावना आहे. आपल्या मनावर आपले नियंत्रण राहिल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. लहान - सहान संघर्ष होण्याची शक्यता असल्याने आपण शांत राहून आपली कामे करावीत. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. अनेक दिवसां नंतर आपण आपल्या प्रेमिकेसह फिरावयास जाऊ शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद सुद्धा घेऊ शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आपण खूप मेहनत करून प्रत्येक स्पर्धेत यशस्वी होऊ शकाल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:श्रावण

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:27 to 13:56

यमगंड:08:01 to 09:30

गुलिक काळ:13:56 to 15:25