धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Tuesday, March 28, 2023

हा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जोडीदाराशी वाद संभवतात. जोडीदाराच्या वागणुकीत बदल होईल, जो आपणास रुचणार नाही. त्यामुळे क्रोधीत होऊन आपण काही बोल बोलू शकाल. प्रेमीजनांसाठी आठवडा रोमँटिक आहे. एकमेकांप्रती प्रेमाने ओढले जाऊन प्रेमळ वार्तालाप करण्यात वेळ घालवाल. ह्या आठवड्यात आपण मानसिक चिंतेने घेरले जाल, तर दुसऱ्या कामात त्रास होईल, तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपल्या उत्तम कामगिरीने आपली प्रतिष्ठा सुद्धा उंचावेल. व्यापारात उत्तेजित होऊन कोणताही निर्णय घेऊ नये. अन्यथा आपले नुकसान संभवते. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा विशेष अनुकूल नाही. त्यामुळे त्यांना जास्त मेहनत करावी लागेल. ह्या आठवड्यात लहान - सहान शारीरिक समस्या संभवतात. आपणास त्याची काळजी घ्यावी लागेल, तसेच गरज भासल्यास योग्य उपचार करून घ्यावे लागतील. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:36

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:मृगशीर्ष

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सौभाग्य

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:49 to 17:21

यमगंड:11:12 to 12:44

गुलिक काळ:12:44 to 14:17