धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Thursday, June 1, 2023

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल व एकमेकांप्रती हृदयात प्रेमाचे अंकुर फुटतील. हा आठवडा आपल्या नात्यासाठी खूपच चांगला असेल. प्रणयी जीवनातील समस्या कमी होतील. एकमेकांप्रती समजूतदारपणा वाढेल व आपण आपले नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न कराल. जे अविवाहित आहेत, त्यांच्यासाठी विवाहाचा प्रस्ताव येण्याची संभावना आहे. आपणास अचानकपणे नशिबाची साथ मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. अचानक धन प्राप्ती संभवते. एखादी पैतृक संपत्ती किंवा वारसा आपणास मिळण्याची संभावना आहे. भावंडांचे सहकार्य मिळेल. सध्या आपणास आळस झटकावा लागेल. त्यामुळे आपणास नोकरीत चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांना सुद्धा त्यांच्या कामात चांगले यश प्राप्त होईल. कार्यालयात सुद्धा आपले मन रमेल. आपण आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांना खूप चांगली वागणूक द्याल. कार्यालयात एखादी पार्टी आयोजित करू शकता, त्यामुळे कार्यालयीन वातावरणात सुद्धा चांगला बदल होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांना यश प्राप्त होईल. हा आठवडा प्रकृतीच्या दृष्टीने सुद्धा चांगला असल्याचे दिसत आहे. असे असले तरी आपणास आपल्या दिनचर्येत नियमितता राखावी लागेल. आठवड्याचे सुरवातीचे व मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:चित्रा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वरिय​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:18 to 15:59

यमगंड:05:53 to 07:34

गुलिक काळ:09:15 to 10:56