धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Thursday, February 2, 2023

फेब्रुवारी महिना आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. कौटुंबिक वातावरणात सकारात्मकता राहील. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. जोडीदाराचा पाठिंबा तर मिळेलच, शिवाय आपणास त्यांचा सल्ला सुद्धा मिळत राहील. त्यामुळे आपले वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांसाठी हा महिना अनुकूल आहे. आपणास आपल्या प्रेमिके कडून विशेष गोष्ट ऐकावयास मिळेल. हि गोष्ट आपल्या व्यक्तिमत्वाशी निगडित असण्याची शक्यता असून आपणास स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवनात मान - सन्मानाची संभावना आहे. महिन्याच्या सुरवातीस आपण विरोधकांवर मात कराल. आपल्या खर्चात वाढ होत असल्याचे दिसून येईल. असे असले तरी वाद - विवादात किंवा एखादा कोर्ट - कचेरीतील निकाल आपल्या बाजूने लागून आपणास मोठा धनलाभ सुद्धा होऊ शकतो. सध्या आपल्या मनात द्वंद्व चालू असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी महिना अनुकूल आहे. ते आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. व्यापाऱ्यांना सुद्धा व्यापारात चांगला लाभ होत असल्याचे दिसून येईल. त्यामुळे ते खुश होतील. विद्यार्थ्यांसाठी महिना चांगला आहे. स्पर्धेत यश मिळू शकते. उच्च शिक्षणात सुद्धा चांगली कामगिरी होऊ शकेल. आरोग्य विषयक कोणतीही मोठी समस्या होईल असे दिसत नसले तरी काही लहान - सहान समस्या उदभवू शकतात. परंतु, जर आपण त्यावर वेळेवर उपचार केलेत तर दुखणे गंभीर स्वरूप धारण करणार नाही. महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:19

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:आर्द्रा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वैध्रुति

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:16 to 15:40

यमगंड:07:19 to 08:42

गुलिक काळ:10:06 to 11:29