धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Saturday, January 28, 2023

२०२३ चा हा पहिला महिना आपल्यासाठी अनुकूल फलदायी आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदीत राहील. वैवाहिक जोडीदाराचा आपणास पूर्ण पाठिंबा राहील. आपण अहंकारीत होऊन त्यांना वेडे - वाकडे काही बोलाल, जे आपल्या संबंधात कटुता निर्माण करू शकेल. तेव्हा ते टाळण्याचा प्रयत्न करा. प्रेमीजनांसाठी हा महिना अनुकूल आहे. प्रेमात आपण आकाशाला गवसणी घालण्याच्या गोष्टी कराल, म्हणजेच खूप मोठ्या - मोठ्या गप्पा मारून आपल्या प्रियव्यक्तीस प्रभावित करू शकाल. हा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी यश प्राप्तीचा आहे. आपले काम कसे व केव्हा पूर्णत्वास न्यावे याची आपणास जाणीव असेल. त्यामुळे आपली प्रतिमा उजळेल व कार्यक्षेत्री आपले कौतुक होईल. असे असले तरी सध्या आपल्या वरिष्ठां पासून सावध राहा. ते गुप्तपणे आपल्या प्रवृत्तींवर नजर ठेवून राहतील. व्यापाऱ्यांसाठी हा महिना चांगला आहे. आपण आपल्या व्यापारी दृष्टिकोनाचा वापर करून काही चांगले निर्णय घ्याल, व त्यामुळे आपणास व्यापारवृद्धी करण्यात मदत होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. त्यांना स्पर्धेत उत्तम यश प्राप्त होण्याची संभावना आहे. ह्या महिन्यात आपली प्रकृती चांगली राहील. कोणत्याही प्रकारचा त्रास होईल असे दिसत नाही. महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:साध्य​

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43