धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Thursday, January 27, 2022

आपल्यासाठी ह्या वर्षांचा पहिला महिना सामान्यच राहील. मनापासून आपण जरी रोमँटिक राहिलात तरी आपल्यात अहंभाव सुद्धा असेल व त्याचा परिणाम आपल्या वैवाहिक जीवनावर होऊ शकेल. आपल्या वैवाहिक जोडीदारावर आपण मनापासून प्रेम केले असले तरी अहंकारामुळे आपण त्यांना असे काही बोलाल कि ज्यामुळे संबंधात निराशेचे वातावरण निर्माण होईल. हा महिना प्रेमीजनांसाठी सामान्य आहे. आपल्या प्रियव्यक्ती पासून आपण दूर व्हाल व त्यामुळे आपले प्रेम काही प्रमाणात आटेल. तेव्हा एकमेकांशी संवाद साधल्यास आपल्यातील दुरावा नष्ट होऊ शकेल. हा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या कष्टाने आपण भरपूर पैसा कमवू शकाल व वरिष्ठांना सुद्धा खुश करू शकाल. हा महिना व्यापाऱ्यांसाठी सुद्धा उत्तम आहे. आपल्या कौशल्याचा आपणास चांगला फायदा होईल. ह्या महिन्यात आपण आजारी पडण्याची संभावना असल्याने आपणास प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना इच्छित फलप्राप्तीसाठी खूपच गंभीरतेने अभ्यास करावा लागेल. ह्या महिन्याचा पहिला व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29