धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Tuesday, May 30, 2023

हा महिना आपल्यासाठी अनेक अर्थानी फायदेशीर होईल. असे असले तरी विवाहितांचे वैवाहिक जीवन चढ - उतारांने भरलेले असेल. नात्यातील प्रेम टिकून राहिले तरी एकमेकांत काहीसा दुरावा निर्माण होऊ शकतो. विरोधाभास निर्माण होईल, जो आपणास आवडणार नाही. प्रणयी जीवनासाठी महिना अनुकूल आहे. नात्यातील रोमांस व आकर्षण टिकून राहील. आपली प्रेमिका मना पासून आपल्या प्रेमाचा स्वीकार करेल. कदाचित विवाहाचा प्रस्ताव सुद्धा येऊ शकतो. एखाद्या मैत्रिणीशी किंवा महिलेशी गैरवर्तन करणे आपणास महागात पडू शकते, तेव्हा सावध राहावे. भांडणा पासून दूर राहावे. नोकरीच्या ठिकाणी स्थिती अनुकूल राहील. आपणास जर नोकरीत बदल करावयाचा असेल तर तसे करण्यात सुद्धा यश मिळू शकते. आपल्या कामाकडे लक्ष द्यावे. प्राप्तीत वाढ झाल्याने आपण खुश व्हाल, परंतु खर्च सुद्धा वाढतील. हे खर्च आपण स्वतःच्या व जोडीदाराच्या आनंदासाठी करू शकाल. व्यापाऱ्यांसाठी हा महिना चढ - उतारांचा आहे. आपणास आपल्या वैयक्तिक जवाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. आपण जर भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदाराशी उत्तम समन्वय ठेवावा. हा महिना विद्यार्थ्यांसाठी चढ - उतारांचा आहे. सध्या फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून महिना मिश्र फलदायी आहे. आपणास आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:हस्त

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धी

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:58 to 17:39

यमगंड:10:56 to 12:37

गुलिक काळ:12:37 to 14:17