धनू   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

वार्षिक मराठी राशीभविष्य(धनू राशी)

Thursday, January 27, 2022

२०२२ चे वर्ष धनु जातकांसाठी मध्यम फलदायी ठरणार आहे. ह्या वर्षी आपण भरपूर प्रवास करणार असल्याने आपणास स्वतःला ओळखण्याची व समजण्याची संधी मिलेल. जेथे सहसा कोणी जात नाहीत किंवा इतरांना त्याची विशेष माहिती नसते अशा ठिकाणी आपण प्रवासास जाल. त्यामुळे आपण रोमांचित व्हाल. ह्या वर्षी आपणास धाडस करण्याच्या अनेक संधी मिळतील. त्यामुळे आपल्या आयुष्यातील संस्मरणीय वर्षात ह्या वर्षाची गणना केली जाईल. वर्षाच्या सुरवाती पासूनच आर्थिक बाबतीत आपणास काही संधी मिळतील, त्या वाया दवडू नका. ह्या वर्षात केलेले परदेश प्रवास यशस्वी होतील. ज्यांनी ह्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यांना वर्षाच्या मध्यापूर्वी परदेशी जाण्याची संधी मिळेल व ज्यांना त्या नंतर जायचे आहे त्यांना त्यांच्या स्वतःमुळेच विलंब होईल. ह्या वर्षात सतत काही ना काही कारणाने आपली प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने ह्या वर्षी आपणास आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी आपला सलोखा राहील. बराच वेळ आपण त्यांच्या पासून दूर राहिल्याने अधून मधून आपण अति भावुक व्हाल. अशा वेळी कुटुंबीयांची आठवण आपणास सतावत राहील. विशेषतः आपण आपल्या माते पासून जास्त दूर राहाल, मात्र त्यामुळे आपल्यातील प्रेम अधिक वृद्धिंगत होईल. अशा प्रकारे हे वर्ष आपणास अनेक नवीन अनुभव देणारे आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

धनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29