मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Sunday, November 27, 2022

हा आठवडा आपल्यासाठी चांगले परिणाम घेऊन येणारा आहे. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपण आपल्या नोकरीस प्राधान्य देऊन मेहनत कराल. आपली मेहनत लोकांच्या नजरेत भरेल. आठवड्याच्या अखेरच्या दिवसात काही खर्च होण्याची संभावना असून त्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी प्रवासाने भरलेला आहे. ह्या आठवड्यात आपण अनेक ठिकाणी प्रवास कराल. त्यामुळे आपणास थकवा जाणवेल. परंतु आपण कामास प्राधान्य दिल्याने आपणास चांगले परिणाम मिळतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले राहील. समाधानी वृत्ती व एकमेकांतील प्रेमळ संवाद आपले संबंध अधिक दृढ करतील. प्रेमीजनांच्या प्रणयी जीवनात चढ - उतार येतील. आपणास प्रेमिकेचे प्रेम व कटुता असे दोन्हींचा अनुभव येईल, तेव्हा सावध राहावे. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात खूप मेहनत करावी लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:00

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:31 to 17:53

यमगंड:12:26 to 13:48

गुलिक काळ:15:10 to 16:31