मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Sunday, July 3, 2022

हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण आपल्या मुलांच्या प्रगतीने आनंदित व्हाल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनातील तणाव कमी झाल्याने आनंदित होतील. परंतु, आपल्या वैवाहिक जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आपण व्यथित होण्याची संभावना आहे. प्रेमीजन ह्या आठवड्यात खूप आनंदित होतील. आपणास आपल्या प्रेमिकेचे भरपूर प्रेम मिळाल्याने आपले संबंध अधिक दृढ होतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या मेहनतीच्या व कार्यक्षमतेच्या जोरावर आपणास मोठे पद मिळू शकेल. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात शासनाकडून काही लाभ संभवतो. आपण जर एखादी सरकारी निविदा भरली असेल तर ह्या आठवड्यात आपणास त्यातून चांगला फायदा होऊ शकेल. विद्यार्थी आपल्या अभ्यासा व्यतिरिक्त मनोरंजनासाठी सुद्धा वेळ काढू शकतील. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:58

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:आश्लेषा

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वज्र

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:47 to 19:29

यमगंड:12:43 to 14:24

गुलिक काळ:16:06 to 17:47