मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Saturday, January 28, 2023

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात उत्तम समन्वय राहिल्याचा त्यांना फायदा होईल. जोडीदाराशी आपलेपणा राहील. जोडीदाराच्या सहकार्याने काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जोडीदारास कामात मदत सुद्धा करतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. थोडा अहंकार असल्याचे दिसून येईल, ज्यास दूर करण्याचा प्रयत्न करावा. सध्या आपली एखादी जुनी व मोठी इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे आपण खुश होऊन आपल्या आनंदात इतरांना सुद्धा सामील कराल. लोकांना मिठाई खाऊ घालाल. प्राप्तीत मोठी वाढ होताना दिसून येईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. व्यापाराशी संबंधित एखादे काम खोळंबले असेल तर ते पूर्णत्वास जाईल. नोकरीत स्थिती आपणास अनुकूल राहील. आपणास आपल्या बुद्धिमत्तेचा लाभ होईल. व्यापाऱ्यांना आपल्या कष्टाचे पूर्ण फळ प्राप्त होईल. प्रगतीची संधी सुद्धा मिळेल. परेदशात जाण्यासाठी आपण सक्षम असाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. असे असले तरी लक्ष इतरत्र भटकण्याची शक्यता असल्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्यांना देण्यात येत आहे. सध्या कोणतीही शारीरिक समस्या उदभवेल असे दिसत नसले तरी एखादे लहान - सहान दुखणे असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:साध्य​

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43