मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Thursday, January 27, 2022

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपण आपला व्यवसाय वाढविण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करू शकाल व त्यासाठी काही नवीन लोकांची भेट सुद्धा घ्याल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात चांगले स्थान प्राप्त करतील. आपले पद वाढू शकते. त्याच बरोबर प्राप्तीत सुद्धा वाढ होऊ शकते. परंतु, कामाच्या ठिकाणी एखाद्या महिलेशी गैर वर्तणूक केल्याने आपले नुकसान होऊ शकते. तेव्हा आपले काम काळजीपूर्वक करावे. आपल्या वरिष्ठांशी सुद्धा नीट वागावे, अन्यथा त्यांच्याशी संबंध बिघडण्याची संभावना आहे. आपणास प्राप्ती चांगली झाल्याने आपण चिंतामुक्त व्हाल. प्रकृतीत थोडी सुधारणा होईल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश राहतील. त्यांना त्यांचा वैवाहिक जोडीदार प्रगती करण्यात मदत करेल. तसेच जवाबदाऱ्या पार पाडण्यात सहकार्य करेल. प्रेमीजन त्यांच्या जीवनात खुश राहतील. ते त्यांच्या प्रिय व्यक्तीसह फिरावयास जाऊ शकतील. कितीही विघ्ने आली तरी विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्त होईल. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29