मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Sunday, November 27, 2022

हा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. ह्या महिन्यात आपल्याला आजारपण येण्याची शक्यता असल्याने आपणास आपल्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. अनावश्यक आहार व प्रवास यामुळे आपली प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. तसेच एखाद्या आर्थिक नुकसानामुळे आपण मानसिक तणावाखाली येण्याची शक्यता सुद्धा आहे. आपणास आपल्या सर्व योजना गुप्त ठेवाव्या लागतील. आधीच जर त्या विषयी कोणाला आपण सांगितले तर लोक त्याचा गैरफायदा घेण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपली कामे दृढपणे करून चांगले परिणाम मिळवू शकतील. आपले वरिष्ठ सुद्धा आपल्या कामाची प्रशंसा करतील. हा महिना व्यापाऱ्यांसाठी चांगला असला तरी आपल्या व्यावसायिक भागीदाराशी आपले थोडे गैरसमज होण्याची शक्यता आहे. विवाहितांसाठी हा महिना चांगला असला तरी सुरवातीस त्यांना आपल्या सासुरवाडीकडील लोकांपासून सावध राहावे लागेल. ते आपणास असे काही बोलतील कि ज्यामुळे आपली मनःस्थिती बिघडू शकेल. हा महिना प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपण आपल्या संबंधांप्रती इमानदार राहून आपले प्रणयी जीवन सुंदर बनवाल. विद्यार्थ्यांना अध्ययनात सामान्य परिणाम मिळेल. हि वेळ खूप मेहनत करण्याची असल्याने आपण जितकी जास्त मेहनत कराल तितके जास्त यश प्राप्त करू शकाल. ह्या महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:00

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:31 to 17:53

यमगंड:12:26 to 13:48

गुलिक काळ:15:10 to 16:31