मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Tuesday, October 19, 2021

हा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपल्या प्राप्तीत जी कमतरता भासत होती ती आता दूर होऊन त्यात जलदगतीने वाढ होऊ लागेल. व्यापारास गती येईल. आपल्याला मोठे नुकसान सोसावे लागू नये म्हणून सरकारी नीतींचा विरोध न करण्याची तसेच त्यांचे उल्लंघन न करण्याची काळजी मात्र आपणास घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्या जातकांना ह्या महिन्यात नवीन लक्ष्यांक मिळण्याची शक्यता आहे. आपणास प्रगतीची संधी सुद्धा मिळेल. नवीन नोकरीसाठी सुद्धा प्रयत्न करू शकाल. कौटुंबिक जीवन समाधानकारक असेल. आपसातील नाते दृढ होईल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणावग्रस्त परिस्थिती उदभवेल. आपल्या जोडीदाराच्या वागणुकीतील बदलामुळे आपण त्रस्त होण्याची शक्यता आहे. जोडीदार थोडा क्रोधीत होण्याची संभावना आहे. प्रेमीजनांसाठी मात्र हा महिना उत्तम आहे. आपले नाते विकसित होईल. महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा सासुरवाडीस जाण्यासाठी अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:37

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:उत्तराभाद्रपदा

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:व्याघात

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:17 to 16:44

यमगंड:10:57 to 12:24

गुलिक काळ:12:24 to 13:51