मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Sunday, July 3, 2022

मीन राशीच्या व्यक्तींसाठी जुलैचा महिना महत्वाचा आहे. आपल्या ज्ञानात वृद्धी होईल. आपण दूरदृष्टी ठेवून भविष्या बद्धल अनेक योजना बनवून त्यासाठी योग्य नियोजन सुद्धा कराल. हा महिना विवाहित लोकांच्या वैवाहिक जीवनासाठी खूपच चांगला आहे. आपण व आपल्या वैवाहिक जोडीदारा दरम्यान प्रेम भावना वाढेल व आपण प्रत्येक बाबतीत एकमेकांना पाठिंबा द्याल, त्यामुळे आपल्यातील अंतर कमी होऊन आपले संबंध दृढ होतील. आपले मन धार्मिक कार्यात रमेल व आपला वैवाहिक जोडीदार सुद्धा धार्मिक कार्य करू लागेल. त्यामुळे घरात पूजा होऊन कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आपल्या वैवाहिक जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. त्यामुळे कुटुंबात काहीसा तणाव निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील लहान व्यक्तीकडून आपणास प्रेम व स्नेह मिळू शकेल. हा महिना संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करण्यास अनुकूल आहे. हा महिना प्रेमीजनांसाठी वरदायी ठरेल. ह्या दरम्यान आपले प्रणयी जीवन सुंदर असेल. आपला एकमेकांवरील विश्वास वाढेल. व आपणास जर इच्छा असली तर आपण प्रेम विवाहाचा विचार सुद्धा करू शकाल. हा महिना नोकरी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळवून देणारा आहे. आपण आपली कामे चिकाटीने कराल. व्यापाऱ्यांना आपल्या कामात यश प्राप्त होईल. विद्यार्थी आपल्या अभ्यासाच्या वेळेत वाढ करण्यात यशस्वी होऊ शकतील, व त्यामुळे त्यांना अध्ययनात चांगले परिणाम मिळतील. ह्या महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:58

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:आश्लेषा

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वज्र

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:47 to 19:29

यमगंड:12:43 to 14:24

गुलिक काळ:16:06 to 17:47