मीन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(मीन राशी)

Thursday, August 18, 2022

हा महिना आपणास चांगले परिणाम देणारा आहे. आपल्या मुलाची प्रकृती बिघडल्याने आपण त्याच्या बद्धल चिंतीत व्हाल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवना विषयी आशावादी राहतील, परंतु आपल्या संबंधात विनाकारण वाद झाल्याने आपण थोडे निराश होण्याची संभावना आहे. परंतु निराश होऊ नका. हळू हळू सर्व काही सुरळीत होईल. ह्या महिन्यात व्यापाऱ्यांना चांगला नफा होऊ शकेल. आपल्याकडे पैश्यांचा ओघ वाढेल व त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपण मनापासून काम कराल, त्यामुळे अनेक ठिकाणी आपला फायदा होऊ शकेल. कुटुंबात तणाव वाढतील. एखाद्या बाबतीत कुटुंबियात सहमती नसली तर घरात वाद होण्याची संभावना आहे. कुटुंबातील लहान व्यक्तींचे आपणास सहकार्य मिळेल व त्यांच्या कडून आपल्याला आनंद प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कामाच्या बाबतीत तटस्थ भूमिका घेतील. त्यांनी आपल्या कौटुंबिक समस्या कार्यालयात घेऊन जाऊ नये, अन्यथा कामात चुका होण्याची संभावना आहे. विद्यार्थी उत्साहित होऊन व मनापासून आपला अभ्यास करतील. ह्या महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी गुरू आहे. मीनेचे जातक आध्यात्मिक, निस्वार्थी आणि मोक्षाच्या दिशेने जाण्याच्या आत्म्याच्या यात्रेबद्दल जागरूक असतात. मीनेच्या व्यक्ती आदर्शवादी जगात राहणंच पसंत करतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:16

आजची तिथी:कृष्ण पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:भरणी

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:19 to 15:56

यमगंड:06:16 to 07:53

गुलिक काळ:09:30 to 11:06