तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Thursday, August 11, 2022

हा आठवडा आपल्यासाठी चांगली बातमी घेऊन येणारा आहे. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. पैश्यांचा ओघ वाढेल. खर्च कमी होतील. प्रकृती उत्तम राहील. ह्या सर्वांमुळे आपण खुश राहाल. कौटुंबिक वातावरणात सुधारणा होईल. कुटुंबातील ज्या व्यक्तीची प्रकृती बिघडली होती ती आता सुधारू लागेल. नोकरी करणाऱ्यांना कामाशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागण्याची संभावना आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे. व्यापाऱ्यांना आपल्या वस्तुंना उठाव येण्यासाठी काही विचार करावा लागेल. असे केल्यानेच व्यापारवृद्धी होऊ शकेल. आपणास संपर्क व मार्केटिंग यांचा लाभ होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. संपर्कात राहून आपण आपले संबंध अधिक दृढ करू शकाल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात अनेक चढ - उतार येतील. आपल्या वैवाहिक जोडीदारास आजारपण येण्याची संभावना आहे. त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आपण मनापासून अभ्यास करून तो अधिक चांगला करण्याचा प्रयत्न कराल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:14

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:आयुष्यमान

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:22 to 15:59

यमगंड:06:14 to 07:51

गुलिक काळ:09:29 to 11:06