तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Thursday, January 27, 2022

हा आठवडा आपणास साधारण फळे देणारा आहे. आठवड्याच्या सुरवातीस खर्चात वाढ होईल. अनावश्यक प्रवासामुळे मानसिक ताण वाढून आपण कोणत्याही गोष्टीमुळे तणावग्रस्त होण्याची संभावना आहे. परंतु, आठवड्याच्या मध्यास हि आव्हाने दूर झाल्याने आपण खुश व्हाल व मानसिक ताण सुद्धा दूर होईल. आठवड्याच्या अखेरच्या काही दिवसात कुटुंबात काही कारणांमुळे भांडण होण्याची संभावना असल्याने कुटुंबात अशांतता पसरेल. आपण त्याने दुःखी व्हाल. आपण हे सर्व टाळण्याचा प्रयत्न करावा. आपल्या प्रकृतीची थोडी काळजी घ्यावी. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्यच राहील. वैवाहिक जोडीदाराशी काही कारणाने मतभेद होण्याची संभावना असून आपणास परस्पर संवाद साधून ते दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपल्या संबंधांकडे गंभीरतेने बघून आपण आपल्या प्रिय व्यक्तीशी विवाहासाठी बोलणी सुद्धा करू शकाल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. आपल्या मेहनतीचे यथोचित फळ आपणास मिळेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस वगळता इतर दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29