तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Monday, September 26, 2022

हा आठवडा आपल्यासाठी अंशतः फलदायी आहे. आपण परदेशात जाण्यात यशस्वी होऊ शकाल. आपण सध्या जेथे काम करत आहात तेथून अन्य राज्यात किंवा शहरात स्थलांतर करू शकाल. खर्चात वाढ होईल. आपणास थोडे आर्थिक नियोजन करावे लागेल. प्राप्ती सामान्यच राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चढ - उतारांना सामोरे जावे लागेल. ह्यास आपल्यात असलेली एकाग्रतेची कमतरता कारणीभूत असेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपल्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. आपणास आपल्या संबंधांना गंभीरतेने घ्यावे लागेल. प्रणयी जीवनात दोघांनीही जवाबदाऱ्यांप्रती समान वृत्ती बाळगण्याची गरज असते हे आपण लक्षात ठेवावे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. त्यांचे शिक्षण उत्तम प्रकारे होऊ शकेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:59 to 09:30

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:14:01 to 15:31