तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Wednesday, June 7, 2023

हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चढ - उतार येतील. ते एकमेकांना समजून घेतील, जवाबदाऱ्या सुद्धा पार पाडतील, तरी सुद्धा एकमेकांत संवादाचा काहीसा अभाव राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूप चांगला आहे. आपण आपल्या जवाबदाऱ्यांसह नात्याची गंभीरता सुद्धा समजून घ्याल. आठवड्याची सुरवात प्रवासाने होईल. मित्रांच्या सहवासात वेळ चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाचा आनंद घेतील व सहकाऱ्यांशी सुद्धा चांगले वागतील. व्यापारासाठी हा आठवडा चढ - उतारांचा आहे. त्यासाठी आपणास तयार राहावे लागेल. कोणतीही नवीन गुंतवणूक करणे टाळा. विद्यार्थी ह्या आठवड्यात खूप मेहनत करतील. असे असले तरी काही अडथळे येण्याची संभावना आहे. परंतु आपण आपल्या मेहनतीने त्यांना दूर करण्याचा प्रयत्न कराल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील. आपल्या दिनचर्येत नियमितता राखून आहारावर लक्ष ठेवावे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:ब्रह्म​

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:38 to 14:19

यमगंड:07:34 to 09:15

गुलिक काळ:14:19 to 16:00