तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Saturday, December 3, 2022

वर्षाचा अखेरचा महिना आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपल्या प्राप्तीत खूप मोठी वाढ होऊन आपली बँकेतील शिल्लक सुद्धा वाढेल. आपल्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल व त्यामुळे हे वर्ष अनेक बाबतीत आपल्या स्मृतीत राहू शकेल. आरोग्यात खूप सुधारणा होईल व आपण सुखाचे जीवन जगू शकाल. आपण मुक्तपणे खाऊ - पिऊ शकाल व त्यामुळे आपण जीवनातील आनंद अनुभवू शकाल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या नाजूक प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्याने आपणास दिलासा मिळेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन आता खुशीने भरलेले असेल. येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या तयारीसाठी हा महिना चांगला आहे. प्रेमीजनांसाठी हा महिना चांगली बातमी घेऊन येणारा आहे. आपण आपल्या प्रियव्यक्तीस समजू शकाल व तिला आपल्या मनातील भावना सांगू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मेहनत करून चांगला लाभ मिळू शकेल. त्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळू शकतील. ह्या महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. हा महिना व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपण जर योग्य दिशेने कष्ट केलेत तर आपणास चांगला लाभ सुद्धा होऊ शकेल.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:04

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:उत्तराभाद्रपदा

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धी

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:46 to 11:07

यमगंड:13:50 to 15:11

गुलिक काळ:07:04 to 08:25