तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Tuesday, October 4, 2022

हा महिना आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. विशेषतः आपल्या आरोग्यात सतत चढ - उतार येतील. आपल्या निष्काळजीमुळे आपले आरोग्य बिघडण्याची संभावना असल्याने आपणास विशेष काळजी घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात खूप मेहनत करतील व त्यामुळे त्यांची कामगिरी सुद्धा उत्तम होईल. आपले वरिष्ठ सुद्धा आपल्या कामगिरीने प्रभावित होतील. व्यापाऱ्यांना त्यांच्या कामातून चांगला लाभ होऊ शकेल. आपण आपल्या प्राप्तीत वाढ करू शकाल. ह्या महिन्यातील आपल्या कामातील प्रगती बघून आपण आनंदित व्हाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. परंतु आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीत व स्वभावात बदल होईल, जो आपणास आवडणार नाही. हा महिना प्रेमीजनांसाठी सामान्य आहे. आपल्या प्रणयी जीवनात एखाद्या गोष्टीने आपण व्यथित होण्याची संभावना आहे. तेव्हा आपल्या प्रियव्यक्तीशी मोकळेपणाने बोलून आपल्या मनातील भावना व्यक्त कराव्यात. प्रणयी जीवनात दोघांनीही सारखीच जवाबदारी घेण्याची आवश्यकता असते हे आपणास लक्षात ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळविण्यासाठी अभ्यासात मेहनत वाढवावी लागेल. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:31

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:26 to 16:55

यमगंड:10:59 to 12:28

गुलिक काळ:12:28 to 13:57