तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Thursday, January 27, 2022

वर्षाचा हा पहिला महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी ठरणारा आहे. आपले आरोग्य उत्तम राहिले तरी काही आव्हाने येऊ शकतात. आपणास घशात खवखवण्याचा किंवा पोटदुखीचा त्रास होण्याची संभावना आहे. विद्यार्थी अभ्यासात रुची दाखवतील. शिक्षण क्षेत्रात त्यांना चांगले यश सुद्धा मिळेल. ते ज्या प्रमाणात मेहनत करतील त्या प्रमाणात त्यांना यश मिळू शकेल. परीक्षेत त्यांची कामगिरी उत्तम होईल. कौटुंबिक जीवनात शांतता राहिली तरी मातेची प्रकृती बिघडू शकते, तेव्हा त्यांची काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना काहीसा प्रतिकूल असल्याने त्यांना कष्ट वाढवावे लागतील, इतकेच नव्हे तर कामात काही चूक होणार नाही याची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. व्यापारी वर्ग आपल्या कामात चांगले योगदान देऊ शकतील व त्याचा त्यांना लाभ सुद्धा होईल. हा महिना आर्थिक दृष्ट्या चांगला आहे. आपल्याकडे पैश्यांचा सतत ओघ चालू राहील. बँकेतील गंगाजळी उत्तम राहील. विवाहितांचे वैवाहिक जीवन चढ - उताराने भरलेले असेल. वैवाहिक जोडीदाराचे आरोग्य बिघडण्याची संभावना असल्याने आपणास त्यांची काळजी घ्यावी लागेल. हा महिना प्रेमीजनांसाठी उत्तम आहे. आपल्या कामात आपण यशस्वी व्हाल. महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29