तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Monday, September 26, 2022

हा महिना अनेक बाबतीत आपल्यासाठी चांगला असला तरी काही बाबतीत आपणास विशेष काळजी घ्यावी लागेल. एखादी दुर्घटना होण्याची संभावना असल्याने वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. कोणाकडू कर्ज घेऊन वाहन घेऊ नये. थोडा खर्च होईल, परंतु प्राप्ती चांगली झाल्याने तो डोईजड वाटणार नाही. आपण लोकांचे भले सुद्धा कराल व त्याच बरोबर स्वतःसाठी नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार सुद्धा कराल. हा महिना व्यापाऱ्यांसाठी उत्तम आहे. आपली कुशाग्र बुद्धिमत्ता व चपळता आपणास आपल्या व्यवसायात प्रगतीपथावर नेऊन ठेवेल. आपणास नवीन व्यावसायिक मागणी आल्याने आपण आपल्या कामात प्रगती करू शकाल. हा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. आपण आपल्या कामाप्रती जागरूक राहाल व आपल्या हातून चूक होणार नाही याची दक्षता घ्याल. त्यामुळे आपल्या कामगिरीत सुधारणा होईल. वरिष्ठ आपल्या कामगिरीने खुश होतील. आपणास शासनाकडून सुद्धा काही लाभ संभवतो. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात सुधारणा होईल. प्रेमीजनांच्या प्रणयी जीवनात प्रेम व रोमांस असून सुद्धा काहीतरी कमी असल्याचे जाणवेल. आपली प्रियव्यक्ती मानसिक दृष्ट्या आपल्या बरोबर नसल्याचे आपणास वाटेल. त्यामुळे आपणास काहीसे नैराश्य येण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगला वेळ मिळेल. तसेच चांगली तयारी करण्याची संधी सुद्धा मिळेल. त्यामुळे आपण खूप कष्ट करून शिक्षणात चांगले परिणाम मिळवू शकाल. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:59 to 09:30

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:14:01 to 15:31