तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

वार्षिक मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Thursday, June 1, 2023

२०२३ चे वर्ष आपल्यासाठी खूपच चांगली बातमी घेऊन येत आहे. आपणास आपल्या कार्यक्षेत्रात पाय घट्ट रोवण्याची व आपल्या योजनांना साकारण्याची संधी मिळेल. आपल्या मनात जर एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार येत असेल तर ह्या वर्षी आपणास त्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदित राहील. कामात व्यस्त राहून सुद्धा आपण आपल्या कुटुंबियांना आवश्यक तितका वेळ देऊ शकाल. तसेच त्यांच्या बऱ्या - वाईट प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल. असे झाल्याने आपले कौटुंबिक नाते मजबूत होईल. कुटुंबियांचे सहकार्य मिळाल्याने आपला आत्मविश्वास सुद्धा वाढेल. वर्षाच्या सुरवातीस आपल्या मातेची प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने त्यांची काळजी घ्यावी. ह्या वर्षात आपण मध्यम अंतरावरील प्रवास जास्त प्रमाणात कराल. ह्या वर्षी आपणास आपल्या लठ्ठपणावर लक्ष ठेवावे लागेल. भोजनात पोषक तत्वांची कमतरता व चरबीयुक्त पदार्थ यांमुळे कोलेस्ट्रॉल व लठ्ठपणा वाढण्याची संभावना आहे. आपण जर कायदे तज्ञ असाल तर हे वर्ष आपणास यशाच्या शिखरावर नेऊ शकेल. आपणास मित्रांचे सहकार्य मिळेल. ते आपल्या पाठीशी उभे असलेले दिसतील. आपण एखाद्या नवीन क्षेत्रात प्रवेश करण्याचा सुद्धा प्रयत्न कराल. ह्या वर्षी आपण आपल्या भावना मनातच दाबून ठेवाल व जीवनात समतोलपणा राखण्यास महत्व द्याल. अनेकदा आपण स्वतःवर अन्याय व आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष कराल. त्याचे गंभीर परिणाम होण्याची संभावना असल्याने सावध राहावे. ज्या व्यक्तीवर आपला विश्वास असेल फक्त अशा व्यक्ती समोरच आपल्या मनातील भावना व्यक्त कराव्यात. असे न केल्यास आपणास त्याचा त्रास सहन करावा लागेल व आपले कामात लक्ष लागणार नाही असे ह्या वर्षाचे ग्रहमान सूचित करत आहे. ह्या वर्षी स्थान परिवर्तन होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी खरेदी करण्यात सुद्धा यश प्राप्तीची शक्यता आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना सुद्धा उत्तम लाभ होईल असे दिसत आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:चित्रा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वरिय​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:18 to 15:59

यमगंड:05:53 to 07:34

गुलिक काळ:09:15 to 10:56