तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

वार्षिक मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Thursday, January 27, 2022

२०२२ हे वर्ष तूळ व्यक्तीना मध्यम फलदायी ठरणारे आहे. ह्या वर्षी आपणास बाहेरगांवी जाण्याच्या अनेक संधी मिळतील, व आपण जर बाहेरगांवी जाऊन तेथेच स्थायी होण्याचा विचार केलात तर त्यासाठी हे वर्ष उत्तम आहे. लवकरात लवकर लाभ मिळविण्यासाठी आपणास आपल्या प्रयत्नांना गती द्यावी लागेल. ह्या वर्षी स्थान परिवर्तनाची दाट संभावना असल्याने कामा निमित्त आपणास कुटुंबाहून दूर राहावे लागेल. आपण जर नोकरी करत असाल तर आपणास स्थान परिवर्तन करण्याची गरज भासू शकेल. संतती इच्छूक दांपत्यांसाठी हे वर्ष आनंददायी बातमी घेऊन येणारे असून त्यांना संतती प्राप्ती होईल. आपण जीवनात परिस्थितीनुसार निर्णय घेत असता व ह्याचाच फायदा आपणास ह्या वर्षी होईल. व्यापारात आपली बुद्धिमत्ताच आपल्या कामी येईल. ह्या सर्वात आपले विरोधक आपणास त्रास देण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर करडी नजर ठेवावी लागेल. सरकारी नियमांच्या विरुद्ध जाऊन कोणा बरोबर कोणत्याही प्रकारचा करार करू नये, अन्यथा मोठे नुकसान होण्याची संभावना आहे. ह्या वर्षी आपणास आपल्या आर्थिक स्थितीवर लक्ष द्यावे लागेल असे ग्रह निर्देशित करत आहे. वायफळ खर्च होऊन आपला ताण वाढेल व आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. असे होऊ नये म्हणून आपणास आधी पासूनच तयार राहावे लागेल. ह्या वर्षाचे ग्रहमान कौटुंबिक वातावरणास विशेष पोषक नसून आपले कौटुंबिक जीवन तणावग्रस्त राहील. हे वर्ष प्रवासासाठी साधारणच आहे. वर्षाच्या सुरवातीस व मे ते जुलै दरम्यान प्रवास केल्यास ते फायदेशीर होतील. अशा प्रकारे आपला व्यवसाय सुद्धा वाढीस लागू शकेल. ह्या वर्षात मातेची प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने आपणास तिची काळजी घ्यावी लागेल. सासुरवाडीशी चांगले संबंध असल्याचा आपणास फायदा होईल तसेच सासुरवाडी कडील लोकांकडून उत्तम मार्गदर्शन व सहकार्य मिळेल, ज्याची आपणास आवश्यकता असेल. मित्र व नातेवाईकांशी संबंधात माधुर्य टिकून राहील. आपले मित्र आपल्या कामात सुद्धा आपणास मदत करतील. त्यामुळे जीवनातील अनेक समस्या दूर होऊन संबंध परिपकव होतील.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29