सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Monday, February 6, 2023

हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहितांना वैवाहिक जीवनाचा आनंद अनुभवता येईल. एकमेकांशी उत्तम समन्वय साधला जाईल. प्रेमीजनांना आपल्या मनातील भावना प्रेमिके समोर मोकळेपणाने व्यक्त करता येतील. सर्व काही सांगितल्यावर तिच्या चेहेऱ्यावर समाधानाने भरलेले स्मित दिसून येईल. आठवड्याच्या सुरवातीस आपण परदेशात जाण्याची तयारी करत असल्याचे किंवा आपल्या कामात नवीन काही करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येईल. आपल्या खर्चात वाढ होईल, परंतु आठवड्याच्या मध्या पासून ते अखेर पर्यंतचे दिवस चांगले असतील. त्या दरम्यान खर्चात कपात होईल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. असे असले तरी आपले वरिष्ठ आपल्या पाठीशी असल्याने आपल्या लहान - सहान चुकांकडे ते दुर्लक्ष करतील. कोणतीही मोठी चूक होणार नाही याकडे लक्ष द्यावे. व्यापाऱ्यांना आपल्या कामात अजून काहीतरी करून दाखवावे लागेल, अर्थात मार्केटिंगवर लक्ष द्यावे लागेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. ते मन लावून अभ्यास करू शकतील. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून येईल. आठवड्याचे मधले व अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:17

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:आश्लेषा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:सौभाग्य

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:41 to 10:05

यमगंड:11:29 to 12:53

गुलिक काळ:14:17 to 15:41