सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Saturday, January 28, 2023

हा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनातील तणाव कमी होत असल्याचे जाणवेल. त्याच बरोबर नात्यातील प्रेम व रोमांस वृद्धिंगत होईल. प्रेमीजनांना त्यांच्या जीवनात चढ - उतार येत असल्याचे जाणवेल. परंतु आपण आपल्या प्रिय व्यक्तीसह एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता. काही समस्या आल्या तरी सुद्धा आपला व्यापार जलद गतीने प्रगती करेल. आपण पूर्वी जे प्रयत्न केले होते त्यांचे फळ आता आपणास मिळू लागेल. आपल्या व्यापारास स्थैर्य येऊन मोठ मोठाल्या ऑर्डर्स मिळतील. त्यामुळे आपली स्थिती अधिक मजबूत होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. त्यांची सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्री स्थिती मजबूत होईल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. ते मन लावून अभ्यास करतील. वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास केल्यास त्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले यश प्राप्त होऊ शकेल. ह्या आठवड्यात मानसिक तणाव व शारीरिक समस्या आपणास त्रास देतील. त्यामुळे प्रकृतीत बिघाड होऊन कामाच्या ठिकाणी समस्या होण्याची संभावना आहे. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:साध्य​

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43