सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Friday, June 2, 2023

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव जाणवेल. त्यामुळे एकमेकातील संलग्नता सुद्धा कमी होत असल्याचे जाणवेल. आपणास ते टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. आपल्या मनात एकमेकांप्रती प्रेम भावना राहील. आपण आपल्या कामाप्रती आपली निष्ठा दाखवाल व त्यामुळे आपली कामे उत्तम होतील. अनिच्छेने सुद्धा वरिष्ठांना आपल्या कामाची प्रशंसा करावी लागेल. ह्या आठवड्यात आपले किरकोळ खर्च होतील. परंतु प्राप्ती सुद्धा चांगली होईल. एखादे नवीन उपकरण खरेदी करण्याची संधी मिळू शकते. कुटुंबियांच्या खुशीसाठी आपण एखादे मोठे काम कराल. कुटुंबियांसह दूरवरच्या ठिकाणी फिरावयास जाण्याची योजना आखू शकाल. व्यापाऱ्यांना सध्या थोडा धीर धरावा लागेल. कोणत्याही नवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी हा आठवडा अनुकूल नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे यथोचित फळ मिळत असल्याचे दिसत आहे. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक छोटा - मोठा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत निष्काळजीपणा न करता योग्य ते उपचार करून घ्यावेत. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकुलक आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:स्वाती

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:पारिध

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:56 to 12:37

यमगंड:15:59 to 17:40

गुलिक काळ:07:34 to 09:15