सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Monday, September 26, 2022

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपले व्यक्तिमत्व उठून दिसेल व आपण इतरांहून वेगळे दिसाल. आपले विरोधक जे आपल्या मागे षडयंत्र रचत होते, ते सुद्धा आपल्या कामगिरीने प्रभावित होऊन आपली प्रशंसा करू लागतील. वरिष्ठ सुद्धा आपल्या कामगिरीने प्रभावित होतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपण काही कडक नियम बनवून त्यानुसार वाटचाल कराल, परंतु आपणास त्यातून खूप मोठा लाभ होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन खूपच सुखद होईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल. त्यामुळे ते खुश होतील. आपण दोघे मिळून आपले वैवाहिक जीवन अधिक सुखद करू शकाल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपणास आपल्या संबंधात थोडे नावीन्य जाणवेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत करावी लागेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे. आपण कुटुंबियांसह एखाद्या हॉटेलात जेवणाचा आनंद घेऊ शकाल.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:59 to 09:30

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:14:01 to 15:31