सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Sunday, November 27, 2022

हा महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या महिन्यात पुष्कळ प्रवास करावा लागल्याने आपणास थकवा जाणवेल. तो दूर करण्यासाठी आवश्यक तितकी विश्रांती घ्यावी. आरोग्यात चढ - उतार येतील. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या बाबतीत आपल्या सहकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागेल. त्यातील काही जण आपल्याला पाठिंबा देणारे असतील, तर काहीजण आपली ईर्ष्या करणारे. तेव्हा सावध राहावे. कोणावरही संपूर्णपणे अवलंबून राहू नये. अन्यथा आपल्या समस्या वाढतील. हा महिना व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपण आपल्या कामात प्रगती करू शकाल. भविष्याचा विचार करून काही नवीन योजना सुद्धा तयार कराल. विवाहितांसाठी हा महिना सामान्यच आहे. आपणास आपल्या वैवाहिक जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. असे केल्याने त्यांचे मन हलके होईल व त्यांना कोणत्याही प्रकारे मानसिक त्रास होणार नाही. हा महिना प्रेमीजनांसाठी सामान्य फलदायी आहे. लहान - सहान भांडण झाले तरी आपल्या संबंधात प्रेम राहील व त्यामुळे आपण प्रणयी जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. विद्यार्थी आपल्या दृढ मनोबलाने अभ्यासात प्रगती करतील. ह्या महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:00

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:पूर्वाषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:31 to 17:53

यमगंड:12:26 to 13:48

गुलिक काळ:15:10 to 16:31